मुंबई, 12 जुलै : जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प झाला आहे. खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून वाहतूक थांबवण्यात आली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून वाहतूक थांबवण्यात आली असून जगबुडी पुलाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांनी आणि धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
जगबुडी नदीनं 7 मीटर पर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. पर्यायी मार्ग नसल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. दरम्यान, कोल्हापूरदेखील पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापुरामध्ये मुसळधार पावसामुळे 70 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड, गगनबावडामध्ये मुसळधार पाऊस आहे. रात्री कोल्हापूर गगनबावडा मार्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोकणातही वैभववाडीला जाणारा मार्ग सुरक्षेसाठी बंद करण्यात येणार आहे. सध्या रस्त्यावर अर्धा फूट पाणी साचलं आहे. राधानगरी धरण 62 टक्के भरलं आहे. त्यामउळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours