सांगली, 12 जुलै : विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांची नाकेबंदी करण्याची रणनीती भाजपने लोकसभा निवडणुकीत आखली होती. त्यासाठी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या लोकसभेच्या अनेक जागाही भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या. आता विधानसभा निवडणुकीतही भाजप याच पॅटर्नचा अवलंब करणार असल्याचं दिसत आहे.
सांगली जिल्ह्याती इस्लामपूर या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चांगली पकड आहे. याच मतदारसंघातून ते आता आमदारही आहेत. पण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे.
आक्रमक शेतकरी नेते अशी ओळख असणारे सदाभाऊ खोत हे विधानसभा निवडणुकीतही भाजपसोबतच जाणार, हे आता जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची भाजपसोबत युती होण्याची शक्यता आहे. सदाभाऊ यांनी विधानसभेसाठी भाजपकडे जागांची मागणीही करून टाकली आहे. त्यात त्यांनी जयंत पाटील हे आमदार असलेल्या इस्लामपूर मतदारसंघाचीही जागा आपल्याकडे मागितली आहे. तसंच या जागेवरून मी स्वत: लढण्यासाठी इच्छुक आहे, असंही जाहीरपणे सांगितलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours