न्यूयॉर्क : कॅन्सर म्हटलं की सगळ्यांच्या काळजाचा ठोता चुकतो. जगभरात एवढं संशोधन झालं मात्र या आजारावर रामबाण उपाय सापडला नाही. आता सगळ्याच शास्त्रज्ञांना आशेचा किरण सापडलाय. काही प्रगत देशांमध्ये केलेल्या संशोधनात  Human papilloma virus म्हणजेच HPV ही लस गुणकारी ठरल्याचा दावा न्यूयॉर्क टाईम्सने केलाय. जगप्रसिद्ध 'लॅन्सेट' या मासिक एक संशोधन अहवाल देण्यात आलाय त्याचा संदर्भ देत टाईम्सने हा दावा केलाय.
विविध 12 देशांमध्ये सुरू असलेल्या संशोधनाच्या आधारे हा दावा करण्यात आलाय. या प्रगत आणि श्रीमंत देशांमध्ये 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 6 कोटी 60 लाख युवक आणि युवतींवर हे प्रयोग करण्यात आले. HPV लसीचा व्यापक प्रमाणात प्रसार करण्यात आला तर गर्भशयाच्या कॅन्सरचं प्रमाण एकदम कमी होऊ शकतं असा दावा करण्यात आलाय.
श्रीमंत देशांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण कमी असतं. कारण निदान झाल्यावर लगेच त्यावर अत्याधुनिक उपचाराच्या सोई तिथे उपलब्ध असतात. मात्र ही सोय गरीब आणि विकसनशील देशांमध्ये उपलब्ध नसते. त्यामुळे अशा देशांमध्ये ही लस अतिशय प्रभावी ठरू शकते असा दावा या संशोधनात करण्यात आलाय. गरीब देशांमध्ये दरवर्षी 3 लाख महिलांचा गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू होते. ही लस दिल्यास त्याचं प्रमाण लक्षणीय कमी होऊ शकतं असा या शास्त्रज्ज्ञांचा दावा आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours