नवी दिल्ली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी (8जुलै) मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेणार आहेत. EVM मशिन्सच्या संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्यामुद्यावर राज हे आयुक्तांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. मनसेसहीत अनेक राजकीय पक्षांनी EVMवर संशय व्यक्त केला होता. EVM हॅक होऊ शकतं त्यामुळे यापुढच्या निवडणुका या EVM मशिन्सव्दारेच घ्याव्यात अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. राज ठाकरे आजच दिल्लीत दाखल झालेत.
राज ठाकरे यांनी याआधीही अनेकदा EVMच्या वापरासंदर्भात आक्षेप घेतले होते. लोकसभा निवडणूक लढवली नसली तरी राज यांनी महाराष्ट्रभर सभा घेऊन वादळ निर्माण केलं होतं. त्यांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. मात्र हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित झाला नाही. लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours