लोणावळा : पुण्यात पहिल्या पावसानंतरचा मान्सून विकेंड साजरा करण्यासाठी पर्यकांनी खडकवासला धरणावर मोठी गर्दी केली केलीय. कुणी कांदा भजी आणि गरमागरम चहाचा आनंद घेतय तर कुणी चटकदार भुट्ट्यांवर ताव मारतंय. पावसाळ्यात खडकवासला चौपाटी हा पुणेकरांसाठी सर्वात जवळचा पिकनिक स्पॉट मानला जातो त्यामुळे रविवारी इथं पर्यटकांची मोठी गर्दी होते. पुणे ग्रामीण पोलिसांनीही गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीचं चांगलं नियोजन केलंय. पावसाळ्यात इथं कायम गर्दी असते मात्र शनिवार आणि रविवार तर गर्दी हाऊसफुल्ल असते.
गेली काही महिने पुणेकरांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. गेली काही होत असलेल्या दमदार पावसाने पुणेकरांची चिंता मिटली आहे. पुण्याला पाणीपुरवढा करणाऱ्या खडकवासला धरणात पाण्याची पातळी वाढत असून तीन महिने पुरेल एवढं पाणी धरणात जमा झालंय. असं असलं तरी पाणी जपूनच वापरलं पाहिजे असं आवाहन प्रशासनाने केलंय. उन्हाळ्यात खडकवासला धरणातला पाणीसाठा निच्चांकी पातळीवर आला होता.
दमदार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होतेय. धरणक्षेञात जोरदार पाऊस पडू लागल्याने गेल्या आठवड्याभरातच पाणीसाठा तब्बल 4 टीएमसीने वाढलाय. गेल्या 24 तासामध्ये तर तब्बल सव्वा टिएमसी जलसाठा वाढून एकूण जलसाठा सव्वा सहा टीएमसीवर जाऊन पोहोचलाय. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटलीय. पुणेकरांना किमान तीन महिने पुरेल एवढा जलसाठा खडकवासला धरणात जमा झालाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours