बारामती, 8 जुलै : धनगर आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.
बारामतीत आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अमोल कोल्हे भाषण करत असताना तेथील काही लोकांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना अमोल कोल्हे म्हणाले की, 'आरक्षणाच्या लढ्यात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहेत.'
'आरक्षणाचे यश हे यात असते की आरक्षण हे आडवे जाण्यापेक्षा तळागाळापर्यंत म्हणजेच आपल्या बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे आणि या आरक्षाणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून मी तुमच्यासोबत आहे,' अशी हमी अमोल कोल्हे यांनी धनगर बांधवांना दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours