लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे शहर  प्रतिनिधी अमर भालचंद्र वासनिक तसेच प्रदेशाध्यक्ष नयन ताराचंद शेंडे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना भंडारा सिटी केअर हॉस्पिटल चे संचालक डॉ. मनोज चव्हाण यांच्यावर कार्यवाही करण्यासंदर्भाचे निवेदन दिले असून, प्रकरण बालकाच्या मृत्यूचे आहे.
        भंडारा येथील तकीया वार्डात स्थित सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये १० जून रोजी चप्पल ठेवणारी रॅक अंगावर कोसळून नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. या बालकाच्या मृत्यूला हॉस्पिटल व्यवस्थापनाचा गलथान कारभार कारणीभूत असून हॉस्पिटलच्या प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. अशी मागणी मृत बालकाच्या वडिलांनी केली आहे. याबाबतची तक्रार रविवार १६ जून ला भंडारा पोलिसात करण्यात आली.
         आर्यन गौरीशंकर अवचटे असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. १० जून रोजी गौरीशंकर अवचटे हे आपल्या पत्नीसोबत तसेच मुलगा आर्यन व मुलगी अवंती यांच्यासह भंडारा येथील सिटीकेअर हॉस्पिटल मध्ये आले होते. अवचटे यांची सासू प्रतिभा विठ्ठलराव नखाते यांना पाहण्यासाठी ते आले होते.
         त्यांना बघून झाल्यावर सायंकाळी ०५:४५ वाजताच्या सुमारास परत जात असताना आर्यन हा चप्पल काढण्यासाठी रॅक जवळ गेला. यावेळी त्याचे वडील पार्किंग मधून कार बाहेर काढण्यासाठी गेले होते. याचदरम्यान चप्पल काढीत असताना आर्यन च्या अंगावर लोखंडी रॅक कोसळली.
          यावेळी आर्यन च्या डोक्यावर जबर मार लागला. तसेच अवचटे यांच्या साळूभाऊ यांची मुलगी त्रिजा हिलाही किरकोळ मार लागला. त्याच दवाखान्यात आर्यन वर प्रथमोपचार करून नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सर्रास आर्यनचा मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे सदर लोखंडी रॅक आर्यन च्या अंगावर कोसळून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.
          आता लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नयन ताराचंद शेंडे तसेच शहर प्रतिनिधी अमर भालचंद्र वासनिक यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेबांस डॉ. मनोज चव्हाण तसेच सिटीकेअर हॉस्पिटल वर कार्यवाही करण्यासंदर्भात निवेदन दिले असून,
        डॉ. मनोज चव्हाण यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करा.
         मुलगा आर्यन अवचटे यांच्या परिवाराला न्याय देऊन त्यांच्या परिवाराला सरकारी नोकरी द्यावी.
         डॉ. मनोज चव्हाण सिटीकेअर हॉस्पिटल भंडारा हा हॉस्पिटल तात्काळ बंद करण्यात यावा.
          डॉ. मनोज चव्हाण सिटीकेअर हॉस्पिटल भंडारा या हॉस्पिटलचा संपूर्ण लेखा-जोखा प्रतिज्ञापत्राद्वारे घोषित करून ऑनलाईन जाहीर करा.
          डॉ. मनोज चव्हाण यांची संपूर्ण संपत्ती प्रतिडणापत्राद्वारे घोषित करून ऑनलाईन जाहीर करा.
          मृतक आर्यन अवचटे यांच्या परिवाराला सरकारि मदद करण्यात यावी.
           अश्या मागण्या निवेदनात दिल्या आहेत.
आणि जर या विषयाला धरून १५ दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेतर्फे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र तसेच उग्र आंदोलन घेण्यात येईल.
            करिता सदर प्रकरणी योग्य चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात यावी. अशी लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेची मागणी असून या आंदोलनाची पूर्ण तसेच संपूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची राहील.
असे निवेदनात म्हटले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours