भिवंडी : रस्त्यावर कितीही वाहनांच्या रांगा असल्या तरी सगळ्यात आधी रस्ता मोकळा केला जातो तो अॅम्बुलन्साठी. कारण अॅम्बुलन्स लोकांचा जीव वाचविण्याचं काम करते. मात्र भिवंडीत एका अॅम्बुलन्सने चार जणांना धडक दिली. यात महिला आणि मुलंही जखमी झालीत. संतप्त नागरिकांनी अॅम्बुलन्सवर दगडफेक केली मात्र त्याही अवस्थेत ड्रायव्हरने गाडी घेऊन पळ काढला आता पोलीस त्या ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.
भिवंडी-कल्याण रोडवरील अप्सरा टॉकीज समोर सुसाट वेगाने जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या चार जणांना सायंकाळी उडवले. ही गाडी अतिशय वेगात होती असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. यात दोन पुरुष एक महिला आणि एका लहान मुलांचा समावेश असून चारजण जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
स्थानिक तरुणांनी रुग्णवाहिकेची तोडफोड केली मात्र रुगवाहिका सुसाट वेगाने निघून गेली असून वाहतूक पोलीस रुग्णवाहिकेचा शोध घेत आहेत. अॅम्बुलन्सच्या ड्रायव्हरनेच असं केलं तर रुग्णांच्या जीवच धोक्यात येणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केलीय. अॅम्बुलन्सवर ड्रायवर ठेवताना पूर्ण पडताळणी केल्यावरच त्याची नेमणूक केली जावी अशी मागणीही केली जातेय.
Post A Comment:
0 comments so far,add yours