मुंबई- डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण ताजे असताना मुंबईत आणखी एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. डॉ.स्वाती शिगवान (वय-31) असे मृत महिलेचे नाव आहेत. स्वाती या डेंटिस्ट होत्या. त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.
अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. स्वाती यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस नातेवाईकांची चौकशी करत आहेत. काही दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत पायल नामक एका डॉक्टरने सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती.
जातीवाचक शेरेबाजी करुन केला जात होता मानसिक छळ
डॉ. पायलने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी 23 मे रोजी गुन्हा नोंदवून नायर हॉस्पिटलमधील तिच्या तीन सहकारी महिला डॉक्‍टरांना अटक केली आहे. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्‍टरांवर रॅगिंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours