कोल्हापूर, 10 ऑगस्ट : पुराने थैमान घातलेल्या कोल्हापूर शहराचा आजही बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला आहे. रात्रभर पावसाने उघडीप घेतल्यामुळे महापूराचं पाणी ओसरू लागलं आहे. पण कोल्हापूर शहर आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला जोडणारा रस्ता अजूनही पाण्याखालीच आहे. त्यामुळे शहरात वाहन येऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.
मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनात झालेला विलंब, यामुळे कोल्हापूर, सातारा आणि सांगली परिसरातील लोकांना पुराचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. आजही पश्चिम महाराष्ट्रातील या पट्ट्यातील अनेक भागात पाणी साचलेलं आहे. आलमट्टी धरणातून विसर्ग वाढल्याने कोल्हापूरमधील पाणी आता काहीसं ओसरं लागलं आहे. त्यामुळे कोल्हापूरकर हायवे खुला होण्याची वाट पाहात आहेत.
दुसरीकडे, कोल्हापूर शहरातील रेस्कू आँपरेशन संपल्यामुळे आता सर्व बचावकार्य महापूराने वेढलेल्या शिरोळ तालुक्यावर केंद्रीत करण्यात आलं आहे. शिरोळ तालुक्यातील 15 गावं पाण्याखाली गेली आहेत. तिथं असणारे किमान 7 हजार पूरग्रस्तं नागरिक मदतीची वाट पाहात आहेत. त्यांना वाचवण्यासाठी नेव्ही, कोस्टगार्ड आणि एनडीआरएफ च्या रेस्कू बोटी शिरोळ तालुक्यात पोहचतील. आज दिवसभरात शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केलं जाणार आहे. तसेच अन्नं आणि शुद्ध पाण्याचा पुरवठाही केला जाणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours