बीड, 30 ऑगस्ट : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचं रण तापायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले करत आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेदेखील कंबर कसून प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. परळीतील वैजनाथ मंदिर आणि रस्ते विकास कामांच्या शुभारंभ सोहळ्यादरम्यान उपस्थितांसोबत संवाद साधताना पंकजा मुंडेंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.
आधी तुमचा पक्ष वाचवा - पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या की,'बारामतीतील नेते येऊन माझ्यावर आरोप करतात पंकजा मुंडेंना परळीचं ज्योतिर्लिंग वाचवता आलं का? तुमचं तुम्ही पाहा ना? आधी तुमचा पक्ष वाचवा, तुमच्या आजूबाजूला बसणारे उद्या कोणत्या पक्षाच्या मंचावर बसतील हे सांगता येत नाही, लागले टीका करायला' अशा शब्दात पंकजांनी विरोधकांना खडेबोल सुनावलेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours