मौजा पांढराबोडी येथील अवैध मुरूम उत्खनन केले प्रकरणी भंडारा तहसीलदार श्री अक्षय पोयाम यांनी दंडात्मक कार्यवाही करणेकरिता वारंवार पत्रव्यवहार केला त्या अनुषंगाने दोन महिन्यांपूर्वी भंडारा पोलीस निरीक्षक श्री सुधाकर चव्हाण यांनी दिनांक 3 जुलै2019नुसार मौजा पांढराबोडी येथील गट क्र132 मधून अवैध उत्खनन झाले  असल्याचे निदर्शनास आणून दिले दिनांक26 जून 2019 ला भंडारा पोलीस निरीक्षक श्री सुधाकर चव्हाण मध्यस्तीने तहसीलदार श्री अक्षय पोयाम यांच्याशी भेट घडवून आणली चर्चा झाल्यावर तहसीलदार यांनी सदर प्रकरणी कार्यवाही करणेकरिता 1 महिना मुदत मागितली होती परंतु सदर प्रकरणी 2 माहिन्याचे वर होऊन सुद्धा तहसीलदार यांनी कार्यवाही केली नाही म्हणून संतापून कार्यकर्त्यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2019 ला  जिल्हाधिकारी नरेश गीते यांचा पुतळा दहन करण्याचे आयोजन केले परन्तु त्याआधी भंडारा पोलिसांनी सतर्कता दाखवून संघटनेचा कार्यक्रम होऊ दिला नाही व स्वाभिमानाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्रिमूर्ती चौकात भंडारा जिल्हाधिकारी श्री नरेश गीते यांचा पुतळा दहन करतेवेळी भंडारा पोलीस यांनी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अडविले परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना ही हार मानणार नसून येणाऱ्या 3 दिवसात कार्यवाही न झाल्यास भंडारा जिल्हा युवा प्रमुख सुरज निंबार्ते व अशोक खोब्रागडे हे तहसील कार्यालयात आत्मदहन करतील त्याची संपूर्ण जबाबदारी भंडारा तहसीलदार श्री अक्षय पोयाम यांची राहील






विडियो देखे- 





Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours