मुंबई, 30 ऑगस्ट : मुंबईमध्ये एका 25 वर्षीय तरुणीनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ओशिवरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्स या उच्चभ्रू परिसरातील केन वुड नावाच्या इमारतीतील ही धक्कादायक घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्ल पंजाबी असं आत्महत्या करण्याऱ्या तरुणीचं नाव आहे. पर्ल बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत आपलं नशीब आजमावू पाहत होती. यासाठी तिनं अनेकदा प्रयत्नदेखील केले. पण तिच्या प्रयत्नांना हवे तसं यश मिळू शकलं नाही. बॉलिवूडमध्ये करिअर होऊ न शकल्यानं सध्या ती कोणत्यातरी खासगी कंपनीत नोकरी करत होती. तर दुसरीकडे पर्ल आणि तिच्या आईमध्ये वारंवार वाद होत असत, अशीही माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्लचं मानसिक आरोग्य चांगलं नव्हतं. यापूर्वीही तिनं दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण गुरुवारी अखेर तिनं तिचं आयुष्य संपवलं. गुरुवारी (29 ऑगस्ट) रात्री उशिरा 12.30 वाजण्याच्या सुमारास पर्लचे घरातल्यांसोबत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात तिनं इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या पर्लला तातडीनं कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ओशिवरा पोलीस या प्रकरणाची सध्या कसून चौकशी करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours