उस्मानाबाद, 30 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक आमदार राणा जगजीतसिंह पाटील राष्ट्रवादी सोडणाच्या तयारीत आहेत. तसंच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कार्यकर्त्यांची मत जाणून घेण्यासाठी आमदार राणा पाटील 31 ऑगस्ट रोजी खुला संवाद साधणार आहेत. 'मला तुमच्याशी काही बोलायचं आहे,' असं म्हणत राणा पाटील यांनी उस्मानाबादमध्ये पोस्टर्सही लावले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधत राणा पाटील आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील, हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

राणा पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांच्या सर्वात जुन्या सहकाऱ्यांपैकी एक आहेत. याआधी शरद पवार यांच्या राजकीय चढउताराच्या काळात पद्मसिंह पाटील यांनी त्यांना साथ दिली होती. यावेळी मात्र त्यांचा पुत्र वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

दरम्यान, राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीनं उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. पण निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांतच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी सुरू झाली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours