मुंबई: भाजपच्या पाठिंब्यावर खासदार झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राणे गेले काही दिवस नाराज आहेत. त्यामुळे या भटीला महत्त्वा प्राप्त झालंय. राणे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार असल्याचंही बोललं जातंय. आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलतानाही राणे यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. राणे नाईलाजाणे दिल्लीत गेले मात्र त्यांचं मन अजुनही महाराष्ट्रातच आहे असे संकेतच त्यांनी दिले होते. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
खासदार नारायण राणे यांनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल आजच मोठं विधान केलं होतं. 'मी माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात राहणार की भाजपमध्ये जाणार याचा निर्णय येत्या 10 दिवसांत घेणार आहे,' असं म्हणत नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे बघितलं जातंय.
नारायण राणे हे काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र युतीत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा भाजपप्रवेश रोखला गेल्याची चर्चा झाली. आता मात्र विधानसभा निवडणुकीआधी राणेंना भाजपमध्ये घेवून कोकणात शिवसेनेलाच शह देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचीही शक्यता आहे. कारण राणेंचा भाजपप्रवेश व्हावा यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच प्रयत्न करत असल्याचं राणेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours