मुंबई, 22 ऑगस्ट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर मिल प्रकरणी आज ईडीकडून चौकशी होणार आहे.  या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कृष्णकुंज आणि दक्षिण मुंबई परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मनसैनिक आक्रमक झाले आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रक काढून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केले. 'ईडीसारख्या संस्थांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना मी योग्य ती उत्तरे देईन. पण, तुम्ही सर्वांनी शांतता राखा, ईडीच्या कार्यालयाजवळ कोणीही येऊ नका. तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या', असे आवाहन राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
मनसैनिकांची आत्महत्या, काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता प्रवीण चौगुले यानं मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्याने त्याने आत्महत्या केल्याचा दावा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रवीणच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत म्हटलं की, ''आपला सहकारी प्रवीण चौगुले याच्या निधनाच्या बातमीने माझं मन व्यथित झालं आहे. मला ईडीची नोटीस आली, या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं. प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा. प्रवीणचं जसं माझ्यावर, पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे याची मला जाणीव आहे'.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours