मुंबई, 25 सप्टेंबर: मुंबईसह उपनगरांमध्ये साधारण 6 तासांपासून पावसानं जोर धरला आहे. तर पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्हात पुढील दोन तासात वीजाच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. पहाटेपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांची पुरती दाणादाण उडाली आहे. तर अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दोन ते तीन तास काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूप पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.
कोकण किनापट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर दोन दिवस मुंबईसह उपनगरात पावसानं उसंत घेतली होती. बुधवारी पाहाटेपासून पुन्हाएकदा मुंबईसह उपनगरांमध्ये वीजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर परिसरात पुढील 48 तास कोसळधार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
ठाणे जिल्ह्यातही विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस आहे. पहाटेपासून पावसाचा जोर असल्यानं सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर भिवंडीतही पावसानं जोर धरला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours