औरंगाबाद: लोकसभा निवणुकीत राज्यात भाजपला घवघवीत यश मिळालं. मात्र शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार चंद्रकांत खैरे यांनी केलाय. भाजपने काम केलं नसल्यामुळेच पराभव झाल्याचा आरोप खैरे यांनी अनेकदा केला होता. आता विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असताना खैरे यांनी भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. शिवसेनेच्या मतदार संघात भाजपचं प्रचार ऑफिस आम्हाला नको आणि त्यांची ढवळाढवळही नको असा इशाराच त्यांनी भाजपला दिलाय. त्यामुळे ऐन निवडणुकीत औरंगाबाद विभागात भाजप विरुद्ध शिवसेने असा सामना रंगणार आहे.

खैरे म्हणाले, लोकसभेत भाजपने माझ्या विरोधात काम केलं. त्यामुळे मला नुकसान सहन करावं लागलं. यंदा मात्र माझं बारीक लक्ष आहे. सेनेच्या मतदार संघात भाजपचे प्रचार कार्यालय सहन करणार नाही. सेना सुद्धा भाजपच्या मतदार संघात ढवळाढवळ करणार नाही. चंद्रकांत खैरे यांच्या या वक्तव्याने मराठवाड्यात भाजप आणि शिवसेनेत नवा वाद भडकण्याची चिन्हे आहेत.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours