मुंबई, 25 सप्टेंबर : राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
'लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगलं खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसंच हे ED चं प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगलं खेळता येत नसलं की काहीही करून चिडायचं. फक्त एक गोष्ट लक्षात असूद्या... आपला गडी लई भारी आहे,' असा विश्वास रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच EDने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकांमधील घोटाळ्याशी संबंधित आरोपांवर हा गुन्हा दाखल झाला. यातल्या अन्य आरोपींमध्ये दिलीपराव देशमुख, ईशरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलवडे, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा आरोप आहे. कमकुवत आर्थिक स्थिती असूनही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आली होती. बऱ्याच प्रकरणांमध्ये कोणत्याही तारणविना कर्ज मंजूर केले गेलं होतं, असा आरोप आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours