नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : महाराष्ट्र विधानसभेचं आज रणशिंग फुंगलं जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची  (Election Commision of India) दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 90 आणि 82 जागा आहेत. या तिन्ही राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. तिन्ही राज्यातील विधानसभेचा कालावाधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे.

दोन्ही राज्यातील सध्याची राजकीय स्थिती

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यात 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप(Bharatitya Janta Party)ने सत्ता मिळवली होती. महाराष्ट्रातील 288 पैकी 122 जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)मुख्यमंत्री झाले होते. हरियाणातील 90 पैकी 47 जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours