मुंबई, 17 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकांचं जोर राज्यात दिसू लागला आहे. अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी युतीचं घोडं अद्यापही अडलेलं आहे. दरम्यान, रविवारी रात्री शिवसेनेनं 135 जागांसाठी मागणी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर 9 जागा या मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचं त्यांनी प्रस्तावात म्हटलं आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव भाजपला मान्य असणार की ते स्वबळावर लढण्याचा निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात विधानसभेतील युतीवर अनेक वेळा चर्चा झाली. पण त्यातून काहीही तोडगा निघाला नाही. त्यात भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. असं असताना आता शिवसेनेनं 135 जागांचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. यासंबंधीचं वृत 'महाराष्ट्र टाईम्स'नं दिलं आहे. रविवारपासून युतीत जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये 50-50 असा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना मान्य होता. त्यानुसार त्यांना राज्यात यशही मिळालं. पण लोकसभा निवडणुकांनंतर भाजप आणि सेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे 50-50चा फॉर्म्युल्यानुसार आताही 144 पैकी 135 शिवसेनेला तर 9 जागा मित्रपक्षाला देण्याचा प्रस्ताव शिवसेनेनं ठेवला आहे. भाजपच्या विद्यमान आमदारांच्या 122 जागा यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात झालेल्या नेते आणि आमदारांच्या जागेचा समावेश नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकत सेना आणि भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात आघाडीला मोठं खिंडार पजलं असं बोललं जात आहे. या इनकमिंगमुळे दोन्ही पक्षात तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार अशाही चर्चा आहेत. दरम्यान, शिवसेना 135 वरून 130 किंवा 125 जागांवर समझोता करू शकते. यावर भाजपकडून दोन दिवसांत कळवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours