मुंबई, 30 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. जवळपास साडेचार तास चाललेल्या बैठकीमध्ये विधानसभा उमेदवारांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. पण अशात भाजप आता विद्यामान आमदारांचं तिकीट कापणार की काय अशी चर्चा आहे. विदर्भात आणि नागपूरमध्ये विद्यमान आमदारांना भाजपकडून डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज मंत्र्यांची मेगाभरती झाली. त्यामुळे भाजप आता नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आहे. त्यात ज्या विद्यमान आमदारांनी गेली 5 वर्ष पक्षासाठी कामं केली नाही अशा आमदारांचं भाजप तिकीट कापरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या आज जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीमध्ये कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, नागपूर दक्षिण, नागपूर पश्चिम आणि उत्तर नागपूरसह विदर्भातही काही आमदारांना डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा मीडियामध्ये आहे. काँग्रेसने रविवारी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. तर युतीमुळे काही जागांचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांनी गेल्या 5 वर्षात पक्षासाठी कामं केली नाही अशा 20 टक्के नेत्यांना भाजपकडून नारळ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अनेक दिग्गज नेत्यांची जोरदार इनकमिंग झाली. त्यामुळे भाजपने जर आयात नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजपमध्ये अनेकांमध्ये नाराजीचा सूर दिसू शकतो. अशा वेळी आता भाजप काय खेळी खेळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours