मुंबई: तुम्हाला पोलिसात काम करायचंय? मग एक उत्तम संधी आलीय. महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी आहे.तिथे भरती केली जाणार आहे. तब्बल 3450 जागांवर ही भरती आहे. त्यात मुंबईत 1076 जागांवर पोलीस भरती होईल. तर पिंपरी चिंचवडसाठी 720 जागा आहेत.
उमेदवाराची पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाईल. नंतर मैदानी चाचणी घेतली जाईल. पूर्वी अगोदर मैदानी परीक्षा घेतली जायची. पण आता यात बदल केलाय.
उमेदवाराकडे ही कागदपत्रं हवीच
तुम्हाला तुमचा फोटो आणि सही ऑनलाइन अपलोड करायची आहे. फोटो 50 KB असायला हवा.
आर्थिकदृष्ट्या मागास असल्यास ते प्रमाणपत्र हवं.
जातीचं आरक्षण असेल तर जात प्रमाणपत्र हवं.
MS/CIT प्रमाणपत्र, सरकारनं मान्यता दिलेल्या कम्प्युटर कोर्सचं प्रमाणपत्र हवं.
लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे ओळखपत्र हवं. ते पॅनकार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट चालेल.
महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला हवा.
या सर्व कागदपत्रांची झेराॅक्स हवी.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours