अहमदनगर, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सगळीकडे एकच राजकीय खळबळ उडाली. शुक्रवारी संध्याकाळी सगळेच कार्यकर्ते त्यांना शोधत होते. यावेळी त्यांचा फोनही बंद होता. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या राजीनाम्याविषयी मोठा खुलासा केला. त्यानंतर शरद पवार हे पुणे दौरा रद्द करून मुंबईकडे अजित पवार यांची चर्चा करण्यासाठी निघाले असल्याची चर्चा सुरू झाली. पण अद्याप अजित पवार कुठे आहेत. याविषयी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
अहमदनगर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर ते नेमके गेले कुठे हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.  अजित पवार मुंबईत आहेत की पुण्यात आहेत? अशा चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार अहमदनगरच्या अंबालिका कारखान्यात असल्याची चर्चा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये अंबालिका शुगर नावाने अजित पवार यांचा साखर कारखाना आहे. ते जेव्हा नाराज होतात किंवा अशा काही घटना घडतात तेव्हा अजित पवार या कारखान्यावर येतात अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला, त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली, ते पुणे दौरा सोडून मुंबईकडेही रवाना झाले पण अजित पवार कुठे आहेत याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अजूनही अजित पवार कुठे आहेत? असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours