मुंबई, 4 सप्टेंबर : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसानं अक्षरशः धुमाशन घातला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. बंगलाच्या उपसागरात आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपटटी, मुंबई तसंच महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहील. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सोमवारी (2 सप्टेंबर) रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं सखल भागांत पाणी साचलं होतं. हिंदमाता, सायन, अॅन्टॉप हिल, वांद्रे, टिळकनगर, मिलन सबवे येथील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं.
गडचिरोलीत गावांचा संपर्क तुटला
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्याचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. जवळपास 100 गावांचा संपर्क तुटला आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर)पर्लकोटा नदीसह बांडीया नदीला पूर आल्याने मोठा पूल पाण्याखाली बुडाला आहे तसंच कुमरगुडा नाल्याचा पूल देखील पाण्याखाली गेल्याने या भागातल्या गावांसह तालुक्याचा संपर्क तुटला होता. अजूनही हीच परिस्थिती कायम आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours