मुंबई, 24 ऑक्टोबर : मतमोजणीला काही तास शिल्लक असताना आता आणखी एक EXIT POLL समोर आला आहे. यात सगळ्यात धक्कादायक निकाल हा कर्जत जामखेड मतदारसंघातून देण्यात आला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांचे पुतणे रोहित पवारविरुद्ध भाजप मंत्री राम शिंदे असा रंगतदार सामना आहे. पण एका वृत्तवाहिनीने दिलेल्या सर्व्हेनुसार भाजपला इथे धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे रोहित पवार हे बाजी मारतील तर भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव होण्याची शक्यता असल्याचा अंदाज या EXIT POLLच्या माध्यामातून लावण्यात आला आहे.
दरम्यान, India Today या वृत्तवाहिनीने दिलेल्या EXIT POLL नुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या जागा कमी होणार असल्याचं म्हटलं आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या EXIT POLL नुसार भाजपला 109-124, शिवसेनेला 57-70 तर काँग्रेस 32-40 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, या EXIT POLL मध्ये 20 महत्त्वाच्या VIP जागांवर धक्कादायक निकाल देण्यात आला आहे. पाहुयात कोणत्या आहेत या महत्त्वाच्या जागा...
- आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील विजयी होण्याची शक्यता
- येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा विजय होण्याची शक्यता- जामनेर मतदारसंघातून भाजपचे गिरीष महाजन हे विजयी होतील असा अंदाज
- नागपूर दक्षिण पूर्व मतदारसंघामधून भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाजी मारतील
- मुंबईच्या वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विजयी होतील असा अंदाज
- कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे बाजी मारण्याची शक्यता
- कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे विजयी होणार असल्याचा अंदाज
- परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे या विजयी होती असा अंदाज
- इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील विजयी होण्याची शक्यता
- नांदगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे छनग भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ जिंकण्याची शक्यता
- मुक्ताईनगर मतदारसंधातून भाजपच्या रोहिनी खडसे एकनाथ खडसे यांच्या मुलीचा विजय होण्याची शक्यता
- संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विजयी होण्याची शक्यता
- लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे धिरज देशमुख विलासराव देशमुख यांचे पुत्र जिंकण्याची शक्यता
- लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख विलासराव देशमुख यांचे पुत्र जिंकण्याची शक्यता
- सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सुशिलकुमार शिंदे यांच्या मुलीचा विजय होण्याची शक्यता
- कणकवली मतदारसंघातून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांचा भाजपमधून विजय होण्याची शक्यता
Post A Comment:
0 comments so far,add yours