मुंबई, 6 ऑक्टोबर : विधानसभा गाठण्यासाठी उमेदवार 5 वर्ष आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करत असतात. पण मोक्याच्या क्षणी झालेली एक चूक त्यांना निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवते. अर्ज भरण्यात केलेल्या अशाच चुकीमुळे यंदा राज्यातील तब्बल 798 इच्छुक निवडणूक लढवू शकत नाहीत. असं असलं तरीही राज्यभरातील तब्बल 4739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी यातील प्रत्येकजणच प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5543 उमेदवारांपैकी 4739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने 798 उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज ठरले वैध?
नंदुरबार - 4 मतदारसंघात 36 उमेदवारांचे अर्ज वैध
धुळे - 5 मतदारसंघात 56 उमेदवार
जळगाव - 11 मतदारसंघात 154 उमेदवार
बुलढाणा - 7 मतदारसंघात 75 उमेदवार
अकोला - 5 मतदारसंघात 101 उमेदवार
वाशिम - 3 मतदारसंघात 60 उमेदवार
अमरावती - 8 मतदारसंघात 151 उमेदवार
वर्धा - 4 मतदारसंघात 59 उमेदवार
नागपूर - 12 मतदारसंघात 181 उमेदवार
भंडारा - 3 मतदारसंघात 66 उमेदवार
गोंदीया - 4 मतदारसंघात 71 उमेदवार
गडचिरोली - ३ मतदारसंघात 44 उमेदवार
चंद्रपूर - 6 मतदारसंघात 90 उमेदवार
यवतमाळ - 7 मतदारसंघात 125 उमेदवार
नांदेड - 9 मतदारसंघात 327 उमेदवार
हिंगोली - 3 मतदारसंघात 54 उमेदवार
परभणी - 4 मतदारसंघात 81 उमेदवार
जालना - 5 मतदारसंघात 133 उमेदवार
औरंगाबाद - 9 मतदारसंघात 208 उमेदवार
नाशिक - 15 मतदारसंघात 212 उमेदवार
पालघर - 6 मतदारसंघात 69 उमेदवार
ठाणे - 18 मतदारसंघात 251 उमेदवार
मुंबई उपनगर - 25 मतदारसंघात 272 उमेदवार (वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती रात्री उशीरापर्यंत अप्राप्त)
मुंबई शहर - 10 मतदारसंघात 84 उमेदवार
रायगड - 7 मतदारसंघात 112 उमेदवार
पुणे - 21 मतदारसंघात 372 उमेदवार
अहमदनगर - 12 मतदारसंघात 182 उमेदवार
बीड - 6 मतदारसंघात 202 उमेदवार
लातूर - 6 मतदारसंघात 120 उमेदवार
उस्मानाबाद - 4 मतदारसंघात 82 उमेदवार
सोलापूर - 11 मतदारसंघात 237 उमेदवार
सातारा - 8 मतदारसंघात 108 उमेदवार
रत्नागिरी - 5 मतदारसंघात 40 उमेदवार
सिंधुदूर्ग - 3 मतदारसंघात 27 उमेदवार
कोल्हापूर - 10 मतदारसंघात 186 उमेदवार
सांगली - 8 मतदारसंघात 111 उमेदवार
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours