- आज दिवाळीचा चौथा दिवस आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते. भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा दिवस असतो.  भाऊ बहिणीला भेटवस्तू देवून तिचे आभार व्यक्त केले जातात.
- मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करतील असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं.  एकनाथ खडसेंनी जळगावमधील मुक्ताई बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मोदी आणि शाहांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस नेतृत्व करतील असंही खडसे म्हणालेत.
- विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड होईल असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. सत्तास्थापनेचा निर्णय शिवसेना आणि भाजपनं एकत्रित बसून घ्यावा अशी भूमिकाही यावेळी त्यांनी घेतली. तसंच शिवसेना लेखी आश्वासन मागत असल्यास भाजपनं त्यावर विचार करावा असं आवाहनही आठवलेंनी केलं आहे.
- अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. गडाख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुऴे आता शिवसेनेच्या आमदारांचं संख्याबळ वाढत चाललं आहे.
- धनंजय मुंडे यांना मोठा झटका  बसला आहे. मुंडेंना पुण्यतील फ्लॅट जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे.  शिवाजीराव भोसले बँकेनं जप्तीची नोटीस पाठावली आहे. दीड कोटींचं कर्ज थकवल्यानं  पुण्यातील फ्लॅट जप्तीची नोटीस त्यांना देण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्हयात विखे पाटलांमुळेच भाजपच नुकसान झाल असा आरोप पराभूत उमदेवारांकडून होतो आहे. मात्र, त्याला विखे पाटील यांनी शिर्डीत उत्तर दिलं आहे. पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे बजावल्याची माहिती विखे यांनी दिली आहे. काही लोकांना आरोप करून राजकारण करायचं असल्याचा पलवाटर विखे यांनी केला आहे.
- यंदाची पवार कुटुंबीयांची दिवाळी एकदम खास आहे. बारामतीच्या गोविंदबागेत सगळं पवार कुटुंबीय एकवटले आणि एकाच मंचावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जय पवार, पार्थ पवार उपस्थित होते. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत सकाळपासूनच गर्दी केली होती.
- तर राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे ज्या शेतीचं नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ मदत करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यसचिवांना दिलेत. त्यामुळे  नुकसान झालेल्या सर्व भागाचे तत्काळ पंचनामे होणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours