भुसावळ, 17 ऑक्टोबर : माझ्यावर अन्याय झाला असून आजही मी पक्षाला तेच विचारतोय की मी काय गुन्हा केला आहे ? ज्या पक्षाने मला मोठं केलं, मंत्रीपद दिलं त्या मायेने एकाएकी मला सोडून दिलं. मात्र, तरीही मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो असे भावनिक उद्गार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भुसावळ येथे प्रचार सभेदरम्यान बोलताना केले. भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री एकनाथ खडसे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
पाच वर्ष संजय सावकारे नाथाभाऊ यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहिले. जवळचे आमदार मात्र पळून गेले. आता नाथा भाऊ च्या मागे गेलो तर आपली ही तिकीट कापले जाईल अशी भीती त्यांना होती.  मात्र तिकीट वाटप माझ्याकडे होते.  मी महाराष्ट्राच्या पार्लमेंटरी बोर्डात असून तिकीट वाटप मला विश्वासात घेऊन च झाले असे यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.
ज्या वेळेस मला विधानसभेने निलंबित केले होते त्यावेळेस एका सभेत प्रमोद महाजन म्हणाले होते की विधानसभेत ला नाथाभाऊचा आवाज की संपूर्ण महाराष्ट्राला आवडतो आणि विधानसभेने एकनाथ खडसे यांना निलंबित केले म्हणजे '' कुंकुवा विना सुवासिनीची कल्पना सहन करता येत नाही "  तसेच नाथाभाऊ विना विधानसभा ही कल्पना मला सहन होत नसल्याचे प्रमोद महाजन हे त्यावेळी बोलताना म्हणाले होते असेही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले. खरंतर यावरून एकनाथ खडसे यांनी यावेळी पक्षाने तिकीट न दिल्याने कुठेतरी मनातील खंत व्यक्त करून पक्षाला एक सुचक संदेश तर दिला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours