मुंबई, 17 ऑक्टोबर: पात्रता नसताना राज्य सहकारी बँकेनं काही लोकांना कर्ज दिलं. शरद पवार यांच्या निर्देशानुसार त्यांना कर्ज देण्यात आल्याचा उल्लेख बँकेच्या ठरावात करण्यात आला. काही लोकांना कर्ज देण्यासाठी शरद पवारांनी पत्र दिल्याची नोंद आहे. त्यामुळं अशा पत्राची आणि कर्जाची चौकशी सुरु आहे. याचा तपास ईडीकडून सुरु असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतच्या विशेष मुलाखतीमध्ये केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours