मुंबई, 30 ऑक्टोबर: लोकल असो किंवा रस्त्यावर दुचाकीने केलेली स्टंटबाजी जीवावर बेतू शकते असं पोलिसांकडून वारंवार आवाहन होत असतानाही स्टंटबाजीच्या घटना थांबयचं नाव घेत नाहीत.

असाच प्रकार मुंबईत लोकलमध्ये घडला. चेंबूर ते कुर्ला हार्बर मार्गावर स्टंट करणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. स्टंटबाजी करणाऱ्या इस्माईल शेख या तरुणाला पोलिसांनी अटक केली.
स्टंटबाजांच्या उच्छादामुळे लोकलचे प्रवासी हैराण झालेत. लोकलनं प्लॅटफॉर्म सोडताच स्टंटबाजानं
लोकलवर चढून दरवाजावर एक पाय ठेवत माकडचाळे सुरू होतात. मग दोन्ही हातांनी लोकलला पकडून धोकादायक खेळ सुरू होतात. एक पाय दरवाजावर ठेऊन दुसरा पाय पोलला लावणं. जीव धोक्यात घालून स्टंटबाजाचे उपद्व्याप माकडांसारखे सुरू होते. मधेच स्टंटबाज लोकल सुरू असताना थोडंसं खाली उतरायचा. हात आणि पायाच्या आधारानं शरीराचा भाग बाहेर काढायचा.
मध्येच त्यानं दोन्ही पाय खाली सोडून दिले. त्यानंतर एका हातानं दरवाजाचा आधार घेत ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झाडा-झुडुपांना स्पर्श करायला सुरूवात केली. गोवंडीतला रहिवासी असलेला इस्माईल शेख या स्टंटबाजाला पोलिसांनी अटक केली आहे. चेंबुर ते कुर्ला मार्गावर केलेल्या या स्टंटचा व्हिडिओ इस्माईलनं सोशल मीडियावर टाकला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे इस्माईलची माहिती मिळाल्यानंतर जीआरपीने माकडचाळे करणाऱ्या या इस्माईल शेखला अटक केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours