नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : पेट्रोल-डिजेलच्या किमती गगनाला भिडत असताना ऑक्टोबर महिन्यात मात्र मोठी घसरण झाली आहे. आज पेट्रोल-डिजेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल झाले नसले तरी मंगळवारी किमतींमध्ये घसरण झाली होती. मंगळावारी पेट्रोलचे दर 6 ते 7 प्रति लीटर तर डिजेलचे भाव 10 ते 11 पैसे प्रति लीटरनं कमी झाल्या होत्या.
इंडियन ऑईलच्या (Indian Oil) वेबसाईटनुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर (Today Petrol Prices) क्रमश: 72.92 रुपये, 78.54 रुपये, 75.57 रुपये आणि 75.72 रुपये प्रति लीटर आहेत. तर, या चारही महानगरांमध्ये डिजलचे दर (Petrol Diesel Price Today) क्रमश: 65.85 रुपये, 69.01 रुपये, 68.21 रुपये आणि 69.55 रुपये प्रति लीटर आहेत.
ऑक्टोबरमध्ये 1.69 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल
ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल डिजेलच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार ऑक्टोबरमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये 1.69 रुपयांची घसरण झाली आहे. तर डिजेलच्या किमतींमध्ये 1.64 रुपये प्रति लीटरनं स्वस्त झाले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours