मुंबई, 02 ऑक्टोबर : युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळालेल्या 124 जागांवर आज सामनाच्या अग्रलेखातून अधिकृत जाहीरच करण्यात आलं. जागावाटपात सव्वाशेच्या आसपास जागा मिळाल्या असून या देवाण घेवाणीत... शिवसेनेला यावेळी देवाणच जास्त झाली आहे आणि घेवाणीत जे मिळालं आहे तिथे शंभर टक्के यश मिळवणारच असा निर्धारही व्यक्तं करण्यात आलां आहे. तसंच राज्यात विरोधकांची अवस्था फाटकी-तुटकी अशी झाल्याची टिकाही सामनातून करण्यात आली आहे.
गेली पाच वर्षे महाराष्ट्रातील कारभार यशस्वीपणे हाकणारी युती एका बाजूला आणि फाटके-तुटके, गर्भगळित विरोधक दुसऱ्या बाजूला हे आजचे चित्र आहे. ‘युती’त दोन पक्षांची जास्तीत जास्त मुद्दय़ांवर सहमती आहे. तसे विरोधकांच्या बाबतीत सांगता येईल काय? रिंगणात उतरणे सोपे असते, पण रिंगणात टिकणे अवघड असते. आता मैदानही आमचे, रिंगणही आमचे आणि रिंगणात धावणारे विजयी अश्वही आमचे. युती झाली आहे, विजय पक्का आहे!
पुण्यात भाजपने सेनेला एकही जागा न सोडल्याने पक्ष पदाधिकारी सेना भवनाला अक्षरशः कुलूप घालून मातोश्रीवर जाऊन बसलेत. तर दुसरीकडे भाजपमध्ये चंद्रकांतदादांपाठोपाठ शिरोळे यांच्या घराणेशाहीलाही विरोध सुरू झाला आहे.
पुण्यात भाजपने शिवसेनेला एकही जागा न सोडल्याने सेना भवनाला हे असं भलं मोठं टाळं लागलंय. नाराज पक्ष कार्यकर्ते 'मातोश्री'वर जाऊन बसलेत शिवाजीनगरमधून उत्सुक असलेले माजी पोलीस भानू प्रताप बर्गे यांनी तर थेट अपक्षच लढण्याची घोषणा करून टाकली. शिवतारे मात्र, या पुणे शहर सेनेच्या या खच्चीकरणाबद्दल सरळ कानावर हात ठेवत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours