ठाणे, 02 ऑक्टोबर : 'गणेश नाईक यांच्या बाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो विचार केला. योग्य वेळेत मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करणार आहेत' असं सांगत रात्री उशीरा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोकण पट्ट्यातील भाजपा उमेदवारांना एबी फार्मचं वाटप केलं. खरंतर मंगळवारी भाजपने विधानसभेसाठी पहिल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. सगळ्यात जास्त कार्यकर्ते आणि कुटुंबासह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांना तिकीट मिळण्याची शक्यता असताना दिल्लीतून जाहीर केलेल्या यादीत त्यांच्या जागी मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या सगळ्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला असल्याचं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. बेलापूर मतदार संघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. खरंतर तिकीट मिळण्याची शक्यता कमी वाटत असल्यामुळे मंदा म्हात्रे या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. पण अगदी शेवटच्या क्षणी गेम चेंज होत मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
युतीच्या फॉर्मुल्यानुसार, नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यात आले आहेत. यानुसार ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बेलापूर मतदार संघातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यास मातोश्री सकारात्मक होती. गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांसह राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours