मनमाड: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांसोबत लढताना महाराष्ट्राचे सुपुत्र जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज यांना वीरमरण आले आहे. वाळुंज हे चांदवड तालुक्यातील भरवीर येथील रहिवासी होते. सोमवारी (21 ऑक्टोबर) त्यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणलं जाणार आहे. मंगळवारी (22 ऑक्टोबर) मूळगाव भरवीर येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे चांदवड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. रविवारी (20 ऑक्टोबर) देखील जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये आपल्या देशाच्या दोन जवानांना वीरमरण आलं. तसंच एक सामान्य नागरिकही मृत्युमुखी पडला. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला आपल्या शूर जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्यानं कुपवाड्यातील तंगधार सेक्टरमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास सीमेपलीकडून घुसखोर पाठवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील केलं. या गोळीबारात परिसरातील दोन घरांचं नुकसान झालं. दरम्यान, या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours