मुंबई, 08 ऑक्टोबर : मुंबईतील शिवाजी पार्कवर  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा विराट असा दसरा मेळावा पार पडला. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा पुर्नउच्चार केला. तसंच भाजपसोबत युती का केली याचा खुलासाही केला आणि ऊतू नका मातू नका, घेतला वसा मोडू नका असं सांगत इशाराही दिला.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
- ऊतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, उद्धव ठाकरेंचा
- डोक्यात जर सत्ता घुसली तर रस्त्यावरचा कुत्राही विचारणार ही नाही
- युतीमुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची मी माफी मागतो
- नोकऱ्या दिल्या नाहीत तर युवाशक्तीचा बॉम्ब होईल
- 10 रुपये प्लेट जेवण देणारी योजना आणणार
- 1 रुपयामध्ये आरोग्य चाचणी
- सत्तेत आल्यावर संपूर्ण कर्जमाफी करणार
- अमित शहा जे बोलतात ते करून दाखवतात, अमित भाई समान नागरी कायदा आणाच
- कलम 370 हटवणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours