केदारनाथ, 23 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं. लोकसभा निवडणुकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अशाच प्रकारे केदारनाथाचा धावा केला होता.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सपत्नीक केदारनाथच्या चरणी दाखल झाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास उरले असताना फडवीसांनी भोलेनाथाचं दर्शन घेतलं. विशेष, म्हणजे आपल्या या दौऱ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.

मे महिन्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशाच प्रकारे केदारनाथाचं दर्शन घेतलं होतं.त्यांच्या या देवदर्शनाची देशभर चर्चा झाली होती. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्र्यांनीही निवडणूक निकालापूर्वी केदारनाथाचं दर्शन घेतलंय.

गेली काही दिवस निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या नेत्यांनी मतदानानंतर कुटुंबासोबत वेळ घालवणं पसंत केलं. तर मुख्यमंत्र्यांनी थेट केदारानाथ गाठलं.

खरंतर भाजपनं ही विधानसभेची निव़डणूक फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढवली असं नाही, तर भावी मुख्यमंत्री म्हणून पक्षानं त्यांचं प्रोजेक्ट केलं होतं. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीचं मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours