वुहान, 22 मार्च : कोरोनामुळे साऱ्या जगात चिंतेचे वातावरण आहे. चीनच्या वुहानमधून आलेला हा विषाणू आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. भारतातही या विषाणूने वेगाने शिरकाव केला आहे. भारतात रुग्णांची संख्या 300हून अधिक झाली आहे. यातच शास्त्रज्ञांना कोरोनाची नवी लक्षणे सापडली आहे. यामुळे 14 दिवसांत समजणारा कोरोना आता 5 दिवसांत समजत आहे.
संपूर्ण जगात या प्राणघातक विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. अलीकडील अहवालात, कोरोना विषाणूची लक्षणे समजण्यासाठी 5 दिवस पुरेसा कालावधी आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शरीरात ही 3 लक्षणं दिसल्यानंतर कोरोना विषाणूचा धोका लवकर समजू शकतो.
इंटर्नल मेडिसीन जर्नलच्या अहवालानुसार, कोरोना विषाणूची तीन विशिष्ट लक्षणे पहिल्या पाच दिवसात आढळतात. यात अमेरिकन संशोधकांनी प्रसिद्ध केलेला हा अहवाल सांगतो की कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर पहिल्या 5 दिवसांत एखाद्या व्यक्तीला कोरडा खोकला येणे सुरू होते. हे कोरोनाचे पहिले लक्षण आहे.
त्यानंतर रुग्णाला जास्त ताप येऊ लागतो आणि त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढते. आतापर्यंत अनेक आरोग्य तज्ञांनी कोरोना विषाणूचे कारण उच्च ताप असल्याचा दावा केला आहे. तसेच, पहिल्या 5 दिवसात एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठीही त्रास होतो. एका अहवालात असा दावा केला गेला आहे की फुफ्फुसात श्लेष्मा पसरण्यामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवतात.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours