मुंबई, 27 मार्च : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांसाठी पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. तरीही देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाविरोधात या लढ्यात शिवसैनिक खारीचा वाट उचलणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून याबद्दल घोषणा केली आहे. 'सेनेचे सर्व खासदार,आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहेत' अशी माहिती राऊत यांनी दिली.
तसंच, 'कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत हा खारीचा वाटा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जिंकू' असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्णं
दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या भारतात 16 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात देशभरात 80 नवीन लोकांनी संक्रमण झाल्याची धक्कादयक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत देशभरात 694 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
तर महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी आणखी 5 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता ही संख्या 130 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours