नवी दिल्ली, 27 मार्च : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कोरोना रुग्णांची संख्या 724वर पोहोचली आहे. तर 66 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्यामुळे एकीकडे नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. पण वाढत्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या भारतात 17 वर पोहोचली आहे.

काल एका दिवसात देशभरात 80 नवीन लोकांनी संक्रमण झाल्याची धक्कादयक माहिती समोर आली होती. त्यात 66 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. असं असलं तरी दिवसेंदिवस वाढत जाणारे आकडे भीती आणि चिंता निर्माण करणारे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. कोरोना व्हायरसचा होणारा परिणाम लक्षात घेता भारत अजून तिसऱ्या टप्प्यात पोहोचला नाही ही दिलासा देणारी गोष्ट आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला असून लोकांनाही घराबाहेर न पडण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी आणखी 5 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता ही संख्या 130 वर पोहोचली आहे. मध्य प्रदेशात गुरुवारी कोरोनामुळे 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यात भोपाळमध्ये 2, ग्वाल्हेरमध्ये 1, शिवपुरी 1, इंदूर 10, उज्जैन 1 आणि जबलपूरमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत. तर राजस्थानमध्येही एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांचे वाढणारे आकडे लक्षात घेता याचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी 21 दिवसांचं लॉकडाऊन घोषणा केली असली तरीही ही तारीख निश्चित नाही ही तारीख वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा प्रसार थांबला नाही तर लॉकडाउन वाढवला जावू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours