नाशिक, 30 मार्च : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आता नाशिकमध्येही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आतापर्यंत परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांनी चाचणी घेण्यात आली होती. परंतु, या चाचणी जवळपास बरेच जण हे निगेटिव्ह आढळले होते. परंतु, यापैकी 9 संशयितांपैकी 8 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले तर एका तरुणाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीने कोणताही परदेश दौरा केला नव्हता.
पॉझिटिव्ह संशयित हा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहे. लासलगावच्या निफाड तालुक्यातील 30 वर्षीय तरुण आहे. या व्यक्तीची कोणताही प्रवास केल्याची  माहिती नाही. पहिला रुग्ण आढळल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून या रुग्णावर विशेष कोरोना कक्षात उपचार सुरू आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
या पॉझिटिव्ह रुग्णाच्या 6 कुटुंबीयांना स्क्रिनिंगसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. तसंच या रुग्णाच्या  संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेणं सुरू आहे.
पहिला रुग्ण आढळल्यामुळे प्रशासकीय आपत्कालीन यंत्रणा गतिमान झाली आहे. तसंच जिल्ह्यात, कलम 144 सक्त अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours