रीपोटर.. संदीप क्षिरसागर
विभागीय आढावा बैठकीत उपाययोजनांवर निर्णय

नागपूर 31-. कोरोना रोगाचा मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रादुर्भावा वर उपाय योजना करण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात उपाय योजना करीत आहे त्यादृष्टीने राज्‍यात जीवनावश्यकवस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांवर कडक  कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष  नानाभाऊ पटोले यांनी नागपूर येथे विभागीय आयुक्त सोबत घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेतला आहे 

या आढावा बैठकीत पालकमंत्री व ऊर्जामंत्री माननीय नितीन राऊत पशुसंवर्धन विकास मंत्री माननीय सुनील केदार मागासवर्गीय विकास मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे विभागीय आयुक्त संजीव कुमार व इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

           कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन चा निर्णय घेण्यात आला यामुळे प्रत्येक शहरात राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या राज्यातील मजूर वर्ग कामगार वर्ग यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असून त्यांना योग्य अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सोयी ची गरज असल्याने सर्व सामाजिक संस्थांनी योग्य ती मदत करून त्यांच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्न सोडवावा त्यांच्या राहण्यासाठी भोजनासाठी आवश्यक त्या सर्व सोयी शासन स्तरावर उपलब्ध केल्या जात असले तरी काही झारीतील शुक्राचार्य निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अश्या साठेबाजांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश याप्रसंगी मा  नाना पटोले यांनी दिले 

              याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जनतेला लॉक डाऊन मध्ये सर्वांनी घरीच रहावे व आपली काळजी आपणच घ्यावी असे आव्हान त्यांनी केले तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून वेळोवेळी त्यांना योग्य निर्देश देत आहेत त्यामुळे जनतेनी घाबरून न जाता फक्त आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी घरीच राहावे व सुरक्षित रहावे असे आव्हान या आढावा बैठकीत प्रसंगी राज्याच्या जनतेला केले आहे

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours