रिपोर्टर.. विलास केजंरकर
भंडारा:- राष्ट्रीय बेरोजगार रजिस्टरच्या मागणी करिता भारतीय युवक काँग्रेसतर्फे बोल २०२० या नावाने संपूर्ण देशपातळीवर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ग्रामीण भागात शिक्षण घेणारी प्राची केशव चटप हिने प्रतिकुल परिस्थितीवर मात करून
चैन्नई (मद्रास ) येथे आयोजित आट्यापाट्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले व यश संपादन केले आहे. राष्ट्रीय पातळीवर भंडारा जिल्ह्याचे नाव केल्याबद्दल द ज्ञानदीप अकॅडमी भंडारा व जिल्हा युवक काँग्रेस कडून जाहीर सत्कार नुकताच करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर होते. प्रमुख पाहुणे नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती जयश्री बोरकर, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राकेश कारेमोरे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, जिल्हा काँग्रेसचे महासचिव मुकुंद साखरकर, भंडारा शहर काँग्रेसचे प्रभारी कार्याध्यक्ष प्रशांत देशकर, तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन फाले, द ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक पाल मोरे , महेश रणदिवे यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन भंडारा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष भूषण टेंभूर्णे यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश कारेमोरे यांनी मानले.
Post A Comment:
0 comments so far,add yours