वरपुणे, 18 मार्च : पुण्यातील कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे कारण पुण्यात आणखी एका व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात आणखी एका रुग्णाला कोरोना झाला असल्याची माहिती पुण्याचे जिल्हा दंडाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यात एकूण 18 तर महाराष्ट्रात 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना झालेल्या रुग्णाचा फ्रान्स आणि नेदरलँड असा प्रवासाचा इतिहास आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णाला त्रास सुरू झाल्याने चाचण्या केल्या असता त्या पॉझिटिव्ह आल्या. रुग्णावर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Home
महाराष्ट्र
BREAKING: पुण्यात सापडला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा 42 वर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours