जालना, 06 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच भरात भर म्हणजे, दिल्लीहून परतलेल्या तबलिगी जमातीच्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा आणखी धोका वाढल आहे. जालन्यात तबलिगी कनेक्शनमुळे संशयितांचा आकडा हा 55 वर पोहोचला आहे.
दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज तबलिगी जमात कनेक्शनमुळे शहागड जवळील डोनगाव येथून आणखी 9 संशयितांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शहागड येथून आधी 26, त्यानंतर 20 आणि आता डोनगावचे 9 असे एका दिवसात एकूण 55 संशयितांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आल्याने जालनेकरांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.
हे सर्व संशयित जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शहागड इथं लातूर येथे पोझिटिव्ह सापडलेल्या दिल्लीच्या निझामुद्दीन मरकज तबलिगी जमातच्या सदस्यांना काही कुटुंबीयांनी घरी बोलावून चहा पाजली होती.
दरम्यान, त्यांच्या संपर्कात आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहागड येथील 46 आणि डोनगाव येथील 9 असे एकूण 55 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले असून सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
सुदैवाने जालना जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पोझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मात्र, शहागड येथील या संशयितांच्या तबलिगी कनेक्शनमुळे जालनेकरांची धकधक वाढली आहे. या सर्व संशयित रुग्णांच्या वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्यांना पण कोरोनांची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होणार असलं तरी जालनेकर मात्र कमालीचे भयभीत झालेले आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours