पुणे, 06 मार्च : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. एकट्या पुण्यामध्येच कोरोनाचे 104 रुग्ण आहे तर पुणे जिल्ह्यात आजपर्यंत 5 करोनाबाधित व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असून काल रविवारी 5 एप्रिलला यातील 3 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे नागिरकांमध्ये भीती वाढली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात करोना लागण झालेले सध्या 98 जण आहेत. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खरंतर पुण्यातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे सहकारनगर, मंगळवार पेठ, नाना पेठ, सिंहगड रोड, कोंढवा या भागात आढळले आहेत.

तर सिंहगड रोडवर वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक या भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्ता पेठ, गंज पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, गुरुवार पेठ, घोरपडी पेठ, शुक्रवार पेठ, पर्वती गाव, सय्यदनगर, हडपसर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, मुंढवा, कोरेगाव पार्क, कोथरूड, मांजरी, नांदेड सिटी, मांगडेवाडी, कात्रज, कर्वेरोड, गुलटेकडी, लक्ष्मीनगर -येरवडा, कल्याणीनगर, बाणेर या ठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासात 8 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या तीन दिवसांत 108 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले असून आज दिवसभरात मुंबईत ५३ रुग्णं वाढले आहेत. गेल्या तीन दिवसांत 8 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. या 8 जणांपैकी 2 जण वयोवृद्ध होते. तर या 2 जनांसह एकूण 6 जण आधीपासूनच खूप दिवस आजारी होते. त्यामुळे आता मुंबईत एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या 433 इतकी झाली आहे. आता पर्यंत केवळ मुंबईत 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours