नवी मुंबई, 26 एप्रिल : महाराष्ट्रासमोर कोरोनाचे संकट आ वासून उभे आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या भीषण परिस्थितीत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस दल जीवाची बाजी लावून आपले कर्तृत्व बजावत आहे. परंतु, नवी मुंबईतून महाराष्ट्राला हादरावून सोडणारी बातमी समोर आली असून एका पोलीस कॉन्स्टेबलच्या घरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे तर आणखी 2 जण रुग्णालयात झुंज देत आहे. या बातमीने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
रस्त्यावर तैनात असलेल्या खाक्या वर्दीतल्या माणूस तुम्हाला आम्हाला वाचवू शकला. परंतु, स्वत: च्या कुटुंबातील सदस्याला वाचवण्यात अपयशी ठरला आहे. नवी मुंबईत एका हेड कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली होती. पण कोरोना नावाच्या या शत्रूने त्यांच्या घरातही प्रवेश केला. त्यांच्या कुटुंबातील घरातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली. यामध्ये त्यांची पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. आज या तिघांपैकी कॉन्स्टेबलच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित हेड कॉन्स्टेबल हे नवी मुंबई पोलीस मुख्यालयात कर्तृव्यावर होते.   त्याच दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली.  त्यांना लागण झाल्यानंतर कुटुंबातील 4 सदस्यांपैकी त्यांचा मुलगा आणि पत्नीलाही लागण झाली. तिघांनाही नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल केलं आहे. आज उपचारादरम्यान, त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर मुलीची आज कोरोनाची चाचणी होणार आहे.
पत्नीच्या मृत्यूमुळे पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे या कुटुंबातील आणखी दोन सदस्य रुग्णालयात लढा देत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours