बारामती: बारामती शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या परिसरातील 44 वार्डामधील 44 नगरसेवक 44 झोनल ऑफिसर व 44 पोलिस कर्मचारी मिळून प्रत्येक वार्डातील दहा ते वीस स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांना अत्यावश्यक घरपोच सुविधा पोहोचवण्यात येणार आहेत. त्यामुळे कुठल्याही नागरिकांना आता घराबाहेर पडता येणार नाही.
बारामती शहरातील एका स्वयंसेवकास लॉकडाऊनच्या कालावधीत 35 ते 40 कुटुंबाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. हे स्वयंसेवक प्रत्येकाच्या घरी जाणार असून त्या नागरिकांना स्वयंसेवकाचा मोबाईल नंबर दिला जाणार आहे. ज्या कुटुंबीयांना अत्यावश्यक बाबीची गरज भासेल त्या नागरिकांनी त्यांना कॉल केल्यावर अत्यावश्यक सेवा करता लागणारा खर्च (त्या वस्तू खरेदीकरता येणारा खर्च) त्या कुटुंबातील व्यक्तीकडून घेतला जाणार आहे.
नागरिकांना घरपोच अत्यावश्यक वस्तू मिळणार आहे. त्यात भाजीपाला, औषधे आदी देण्यात येणार आहे. यामुळे कोरोनाचा व्हायरस संसर्ग मुळापासून नष्ट करता येईल. नागरिकांना घरी बसून सर्व सेवा मिळतील. पोलिसांना शहरात गस्ती करीता तात्काळ संपर्काकरता वाकी-टॉकी देण्यात आली आहे. त्यामुळे तात्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचणार आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत आता नागरिकांनी कोणतीही सबब न सांगता घरातच बसावे व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours