लातूर : लातुरातील निलंगा तालुक्यातील राठोडा येथे महानुभाव पंथाच्या चातुर्मास कार्यक्रमासाठी आलेल्या तेराशेहून अधिक साधकांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे तेवीस दिवसांपासून अडकून पडलेले तब्बल साडेतेराशे साधक आता आपापल्या घरी परतणार आहेत. मंत्रालयातून या सर्वांना सुखरूप घरी पाठण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एक महिन्याच्या सत्संग सोहळ्यासाठी जाधववाडी (ता. जुन्नर, पुणे) येथून 27  फेब्रुवारी रोजी पंधराशे साधूसंत सत्संग सोहळ्यासाठी राठोडा येथे आले होते. तब्बल एक महिन्याचा म्हणजे 29 मार्चपर्यंत हा महानुभव पंथाचा सत्संग सोहळा चालला होता. देशभरामध्ये कोरोना या विषारी व्हायरसने धुमाकूळ घातल्याने सरकारने याला अटकाव घालण्यासाठी 22 मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सत्संगासठी आलेल्या या साधूसंतांनाही याचा फटका बसला व ते राठोडा गावातच अडकून पडले होते.


याची माहिती प्रशासनाला होती. मात्र यातून कुणीही बाहेर जाणार नाही,असा प्रशासनाने निर्णय घेतला आणि ते सर्व या ठिकाणी अडकून पडले. पंधराशेपैकी काही भक्त विविध कामासाठी बाहेरगावी गेले होते. ते तिकडेच अडकले तर उर्वरित 1346 भक्त राठोडा गावात आहेत. यात 824 महिला तर  522 पुरुषांचा समावेश आहे. यात काही लहान मुलेही आहेत.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours