मुंबई: मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्यात शुक्रवारी आणखी 77 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर पाच जण दगावले आहेत. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2120 झाली आहे. त्याचबरोबर 201 संशयित रुग्ण विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईत कोरोनानं थैमान घातलं असताना एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे मुंबईतील रेड झोन परिसरात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मुंबईच्या वरळी विभागात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली आहे. सलग चार दिवस रुग्ण संख्येत घट होत आहे.
वरळीत कोरोनाबाधितांची संख्या 389 इतकी जास्त झाली आहे. मात्र, गेले चार दिवस रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 14 एप्रिल रोजी या भागात 52 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 15 एप्रिलला 27, 16 एप्रिलला 11 आणि 17 एप्रिल म्हणजे आज 9 रुग्ण आढळले आहे. याचा अर्थ असा की, या परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळू हळू कमी होताना दिसत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours